करोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्याने देशाचे अर्थचक्र थांबले. ते पुन्हा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत २० लाख कोटींची घोषणा केली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टप्प्याटप्प्याने ही मदत जाहीर केली. मात्र, सर्वच स्तरांवरील नागरिकांमध्ये भविष्याची चिंता गडद झालेली आहे. विशेषत: अर्थचिंता वाढू लागली आहे. आर्थिक क्षेत्रात पुढील काळात आपल्यासमोर कोणती आव्हाने असतील याची सविस्तर चर्चा ‘लोकसत्ता विश्लेषण’ या उपक्रमाच्या नव्या पर्वात विख्यात अर्थविश्लेषक डॉ. अजित रानडे करणार आहेत. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. प्रस्तुत हा वेबसंवाद आज सायंकाळी ५ वाजता होईल.

सहभागी कसे व्हाल?  

https://tiny.cc/Loksatta_Vishleshan_26May या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडीवर संदेश येईल. त्यानंतर या वेबसंवादात भाग घेता येईल. अधिक माहितीसाठी  https://loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.