मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातील उमेदवारांनी चमकदार कामगिरी केली. त्यात पहिल्याच प्रयत्नात यश मिळविणाऱ्या गुणवंतांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. बीडमधील अवघ्या २३ वर्षांच्या मंदार पत्की याच्या यशाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने अभ्यास कसा केला, वेळेचे नियोजन कसे केले, याबाबत सर्वानाच कुतूहल आहे. ते शमविण्याची संधी ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ वेबसंवादात आज वाचक, परीक्षार्थीना मिळणार आहे. स्पर्धा परीक्षार्थीना आपल्या प्रश्नांची उत्तरे या वेबसंवादातून मिळू शकतील. आज संध्याकाळी ५ वाजता हा वेबसंवाद होईल.
वेबसंवादात सहभागी होण्यासाठी : https://tiny.cc/SpardhaParikshaGuru_10Aug येथे नोंदणी आवश्यक.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 12:48 am