कोटय़वधी रुपये उकळूनही नवीन महाबळेश्वर, पोलादपूरच्या भूखंडांचा ताबा नाहीच

थंड हवेचे नवे ठिकाण म्हणून ‘नवीन महाबळेश्वर’.. पोलादपुरात स्वतचे फार्म हाऊस या ‘दिशा डायरेक्ट’ कंपनीने दाखवलेल्या ‘सेकंड होम’च्या स्वप्नाला भुलून मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांनी त्यासाठी कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केली खरी; मात्र पैसे भरूनही ‘दिशा डायरेक्ट’कडून भूखंडांचा ताबा मिळत नसल्याने गुंतवणूकदार कमालीचे हवालदिल झाले आहेत. ‘दिशा डायरेक्ट’च्या हेतूंबद्दलच त्यांच्या मनात शंका निर्माण झाली असून, गुंतवलेले आपले पैसे सव्याज परत मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे.

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

‘लँडमार्क मिडोज’ या रोह्य़ाजवळील ताम्हिणी घाटातील गुंतवणूकदारांच्या समस्यांना ‘लोकसत्ता’ने १३ फेब्रुवारी २०१६ रोजी वाचा फोडली होती. त्यावेळी ‘दिशा डायरेक्ट मार्केटिंग सव्‍‌र्हिसेस’चे व्यवस्थापकीय संचालक संतोष नाईक यांनी, ‘आम्ही नेहमीच ग्राहकांचे हित नजरेपुढे ठेवले’, असा दावा केला होता. ‘या प्रकल्पातील केवळ १० ते १५ टक्केच काम बाकी असून, आपण जातीने लक्ष घालून चार ते पाच महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करू’, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या आश्वासनास जुलैमध्ये पाच महिने पूर्ण झाले. परंतु कुंपण वा कथित ट्रान्सफॉर्मरच्या तारा उभारण्याच्या थातूरमातूर कामापलीकडे प्रकल्प सरकलेला नाही, असे ताम्हिणी प्रकल्पातील गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. ताम्हिणी तसेच शिरोळ व वाडा येथील अनुक्रमे लँडमार्क हिल्स आणि वॉटरफ्रंट प्रकल्पात निदान गुंतवणूकरादांना भूखंडाचा ताबा तरी मिळाला. परंतु ब्युमाउंट (नवीन महाबळेश्वर) आणि फार्म व्हिलेज (पोलादपूर) या प्रकल्पांसाठी पूर्ण रक्कम भरूनही गेल्या तीन वर्षांपासून गुंतवणूकदारांना हक्काचा भूखंडही पाहता आलेला नाही.

आपल्या मालकीचा भूखंड पाहण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या गुंतवणूकदारांना रस्ता खराब असल्याची सबब सांगितली जात आहे. ‘आम्ही स्वत: जागेवर जातो. आम्हाला पत्ता द्या, असे सांगितल्यावर उत्तरेच दिली जात नाहीत’, असे एका गुंतवणूकदाराने सांगितले. ‘अधिकच आग्रह धरला तर आमच्यावर विश्वास नसेल तर पैसे परत घेऊन जा, असे सुनावले जात आहे. पैसे परत मागणाऱ्या गुंतवणूकदारांनी व्याजासह पैसे परत मागितले तर उत्तरेही दिली जात नाहीत. या प्रकरणी नाईक यांनी सुरुवातीला लघुसंदेशांना उत्तरे दिली. ते स्वत: भेटतच नाहीत’, अशी तक्रार गुंतवणूकदारांची आहे.

नव्या महाबळेश्वरात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती. तेथे व्हॅली व्ह्य़ू रिसॉर्ट आणि व्हिला उभारण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पोलादपूरजवळ फार्म व्हिलेज हा प्रकल्प २०० एकरवर राबविण्यात येणार असल्याचे सांगून पुण्याहून अनेक गुंतवणूकदारांना नेण्यात आले होते. जागीच भूखंड आरक्षित करणाऱ्यांना सवलतीही देण्यात आल्या. पपई वा डाळिंबाचे उत्पादन घेता येईल, चार वर्षांंनंतर दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळेल, भूखंडाची किंमत वाढतच जाईल. हक्काचे फार्म हाऊस बांधता येईल.. अशी कितीतरी आश्वासने देण्यात आली. पोलादपूर येथील कथित फार्म व्हिलेज प्रकल्पात नऊ लाख ९० हजार रुपये भरले आहेत. परंतु त्याबाबत फक्त आश्वासने दिली जात असल्याचेही या गुंतवणूदारांनी सांगितले.

रूपेरी वलयाची मोहिनी

एका प्रसिद्ध अभिनेत्याने, आपण या योजनेत सहभागी झाल्याचे सांगितल्याने आमचा कंपनीवरील विश्वास वाढला, असे अनेक गुंतवणूकदारांनी सांगितले. प्रत्यक्षात तीन वर्षे उलटूनही भूखंडाचे वितरण, नगदी फळझाडे, करारनामा, सुरक्षा आदींच्या नावे ठणाणा आहे. त्याचवेळी माळशेज घाटात हेमा मालिनी यांना सदिच्छादूत बनवून ‘दिशा डायरेक्ट’ आणखी गुंतवणूकदारांना भरीस घालत आहे, याकडे या गुंतवणूकदारांनी लक्ष वेधले आहे.

‘प्रकल्प पूर्ण करणाच’

या संदर्भात ‘दिशा डायरेक्ट’चे संचालक संतोष नाईक यांनी, न्यू महाबळेश्वर आणि पोलादपूर येथील प्रकल्प रखडल्याचे मान्य केले. ‘काही ठिकाणी भागीदारात भूखंड खरेदी केले आहेत तर काही ठिकाणी भूखंडसंपादनाच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत. ऐनवेळी भागीदारांशी झालेल्या वादामुळे भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा देण्यास वेळ होत आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कितीही विलंब झाला तरी हे प्रकल्प पूर्ण करणारच’, असा दावा संतोष नाईक यांनी पुन्हा केला. ‘मात्र त्यास किती वेळ लागेल हे सांगता यायचे नाही’, असे उत्तर त्यांनी दिले. ‘कोणाचीही फसवणूक करण्याची आपली नीती नाही. काही प्रकल्पांत दिलेली आश्वासने पूर्णपणे पाळली आहेत’, असेही ते म्हणाले.