10 August 2020

News Flash

नववीच्या फेरपरीक्षेवरून शाळा-पालकांत वाद

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांचा विरोध

प्रतिकात्मक छायाचित्र

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांचा विरोध

मुंबई : टाळेबंदीमुळे नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा रद्द करून त्यांना थेट दहावीत प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने एप्रिलमध्ये जाहीर के ला असला, तरी त्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांबाबत स्पष्ट सूचना नसल्याने पालक आणि शाळांमध्ये वाद सुरू झाला आहे. नववीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची तरतूद जुन्या शासन निर्णयात असल्याने त्यादृष्टीने शाळांनी तयारी सुरू के ली. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांवर दोन्ही इयत्तांच्या परीक्षांचा भार पडेल या सबबीखाली पालक फेरपरीक्षेला विरोध करत आहेत.

पहिले सत्र, प्रात्यक्षिके , अंतर्गत मूल्यमापन यांतील प्राप्त गुणांच्या आधारे नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश द्यावा, असा शालेय शिक्षण विभागाचा टाळेबंदीतील आदेश आहे. यानुसार दादरच्या सेंट पॉल शाळेने नववीचा निकाल लावला. त्यामुळे पहिल्या सत्रात अनुत्तीर्ण असणारे काही विद्यार्थी अंतिम निकालातही अनुत्तीर्ण ठरले. त्यांची फेरपरीक्षा ३० जूनपासून सुरू होणार असल्याचे संदेश शाळेने पालकांना पाठवले. अनेक विद्यार्थी प्रतिबंधित क्षेत्रात राहत असल्याने पालकांनी टाळेबंदीत परीक्षा घेण्याला विरोध के ला. त्यामुळे शाळेने परीक्षा पुढे ढकलत असल्याचे संदेश पाठवले. मात्र, तरीही अ‍ॅपवर लॉग इन मिळत नसल्याची एका पालकाची तक्रार आहे. फेरपरीक्षा होईपर्यंत विद्यार्थी दहावीचाही अभ्यास करू शकणार नसल्याने विरोध करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

‘परीक्षा द्यावी लागेल’

‘वर्षभरातील सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. काही विषयांची वार्षिक परीक्षाही विद्यार्थ्यांनी दिली, तर काही विषयांची परीक्षा टाळेबंदीमुळे राहिली. तीच परीक्षा आता पुनर्परीक्षा म्हणून दाखवली जाते आहे’, असे एका पालकाने सांगितले. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक फादर जोसेफ यांच्याशी संपर्क  साधला असता संपर्क  होऊ शकला नाही. मात्र, ‘शाळा सुरू झाल्यावर नववीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल’, असे शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिले यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 3:34 am

Web Title: dispute between school and parents over ninth re examination zws 70
Next Stories
1 बीकेसी रुग्णालयातील एक हजार रुग्ण करोनामुक्त
2 जुन्या वादातून शेजाऱ्याच्या मुलाचा खून
3 मानखुर्दमधील अंध व्यक्तीकडून रक्तद्रव दान
Just Now!
X