मुंबई : करोनाबाधित रुग्णांना आवश्यक मदत व  तातडीने रुग्णशय्या उपलब्ध करून देण्यासह  विविध अडचणी दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने  रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली’  जून २०२० पासून अंमलात आणली आहे. त्यासाठी सर्व २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ (वॉर्ड वॉर रूम्स) कार्यान्वित करण्यात आले आहेत.

करोनाबाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांना काही मदत पाहिजे असल्यास विभागीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिके ने केले आहे.

प्रत्येक विभागीय नियंत्रण कक्षात तीन सत्रांमध्ये २४ तास वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत.  या कक्षांचे संपर्क  क्रमांक पुढीलप्रमाणे : ए विभाग २२७० ०००७, बी विभाग २३७५ ९०२३, सी विभाग २२१९ ७३३१, डी विभाग २३८३५००४, ई विभाग २३७९ ७९०१, एफ/दक्षिण विभाग २४१७ ७५०७, एफ/उत्तर विभाग २४०११३८०, जी/दक्षिण विभाग २४२१ ९५१५, जी/उत्तर विभाग २४२१ ०४४१, एच/पूर्व विभाग २६६३ ५४००, एच/पश्चिम विभाग २६४४ ०१२१, के/पूर्व विभाग २६८४ ७०००, के/पश्चिम विभाग २६२० ८३८८, पी/दक्षिण विभाग २८७८ ०००८, पी/उत्तर विभाग २८४४ ०००१, आर/दक्षिण विभाग २८०५ ४७८८, आर/उत्तर विभाग २८९४ ७३५०, आर/मध्य विभाग २८९४ ७३६०, एल विभाग ७६७८०६१२७४ किंवा ७७१०८७०५१०, एम/पूर्व विभाग २५५२ ६३०१, एम/पश्चिम विभाग २५२८ ४०००, एन विभाग २१०१ ०२०१, एस विभाग २५९५ ४०००, टी विभाग २५६९ ४०००.