07 March 2021

News Flash

सागरी सेतूवरील अपघातातून डॉक्टर बचावले

वांद्रे वरळी सागरी सेतूवर भरधाव वेगाने जाणाऱ्या जग्वार गाडीने दुभाजकाला दिलेल्या धडकने अपघात झाला. विशेष म्हणजे या गाडीतील डॉक्टरांसह तिघेजण सुदैवाने बचावले.

| November 29, 2013 02:18 am

वांद्रे वरळी सागरी सेतूवर भरधाव वेगाने जाणाऱ्या जग्वार गाडीने दुभाजकाला दिलेल्या धडकने अपघात झाला. विशेष म्हणजे या गाडीतील डॉक्टरांसह तिघेजण सुदैवाने बचावले.
दादर येथील डॉक्टर श्रीपाद खेडेकर, त्यांचे मित्र गौतम तोरणकर वांद्रे येथील एक कार्यक्रम आटोपून घरी परतत होते. चालक अजय सिंग हा गाडी चालवत होता. सागरी सेतूवर त्यांची गाडी भरधाव वेगात होती. रात्री १ च्या सुमारास वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीने वळणावरील दुभाजकाला धडक दिली. या अपघातात गाडीतील तिघांना किरकोळ खरचटले पण गाडीचे थोडे नुकसान झाले. या मुळे बराच वेळी सागरी सेतूनवरील वाहतूक ठप्प होती. वरळी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. चालकाने मद्यपान केलेले नव्हते. पोलिसांनी याप्रकरणी डायरी नोंद केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 2:18 am

Web Title: docter save his life in an accident at worli sea link
Next Stories
1 नवी मुंबईत मित्रांच्या भांडणात एकाचा मृत्यू
2 हिवाळी अधिवेशनात ‘आदर्श’ अहवाल मांडणार का? – उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न
3 भविष्याच्या निर्वाहाची चिंता मिटवणारे सरकारी ‘दूत’
Just Now!
X