News Flash

नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण

सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण होण्याच्या घटना सुरुच आहेत.

सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण होण्याच्या घटना सुरुच आहेत. मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयात शनिवारी सकाळी रुग्णाच्या सहा नातेवाईकांनी मेडिसीन विभागातील दोन निवासी डॉक्टरांना मारहाण केली. रुग्णालय प्रशासनाने तातडीने कारवाई करत रुग्णांच्या या नातेवाईकांना आग्रीपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी नातेवाईकांना अटक केली आहे.
नायर रुग्णालयाच्या मेडिसीनच्या वॉर्ड क्रमांक १६ मध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या मकिना सदरेआलम अन्सारी (५०) यांचा मृत्यू झाला. त्याचदरम्यान, ३ महिला आणि ३ पुरुष वॉर्डमध्ये आले, तुम्ही मिळून आमच्या आईला जीवे मारले, असे म्हणत त्यांनी निवासी डॉक्टर समीर भागवत आणि डॉ. सिध्दार्थ हरिंद्रनाथ यांना मारहाण करण्यास सुरुवात
केली.
मारहाण सुरु असताना उपस्थित असलेल्या एका सुरक्षारक्षकाने तातडीने मुख्य सुरक्षा कार्यालयाला कळविले आणि तातडीने या सहाही नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आले.
आग्रीपाडा पोलिसांनी या मोईनुद्दीन अन्सारी (२७), मैफूज अन्सारी (२९), मोईन अन्सारी (१८), सबीना अन्सारी (२४), अफसाना अन्सारी (२२), अमिना अन्सारी (३५) या सहा नातेवाईकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2016 12:10 am

Web Title: doctor assaulted in nair hospital
Next Stories
1 जमीन, जावई आणि मंत्री..
2 वादग्रस्त विधाने भोवली!
3 ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन
Just Now!
X