17 October 2019

News Flash

अल्पवयीन रुग्णावर डॉक्टरचा बलात्कार

तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करून नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका डॉक्टरला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर जयेश कतीरा (४८) असे या डॉक्टरचे

| September 7, 2014 03:35 am

तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करून नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका डॉक्टरला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर जयेश कतीरा (४८) असे या डॉक्टरचे नाव आहे.
डॉक्टर जयेश कतीरा याचे ठाण्यातील कापूरबावडी येथे आकांक्षा नावाचे नर्सिग होम आहे. तो मुलुंडच्या लोकरचना कॉलनी येथे राहातो. १ सप्टेंबर रोजी एक १७ वर्षीय मुलगी त्याच्याकडे पोटदुखीची तक्रार घेऊन आली होती. त्या वेळी डॉक्टर कतीरा आणि त्या मुलीची ओळख झाली होती.
शुक्रवारी पुन्हा या मुलीने पोटदुखीची तक्रार असल्याचे सांगत डॉक्टर कतीराला फोन केला होता. दुपारी कतीरा मुलीला गाडीतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेऊन गेला. गाडीतच डॉक्टरने आपल्यावर लैंगिक अत्याचारकेल्याचे या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तिने सुरुवातीला कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा गुन्हा मुलुंड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पहिल्यांदा जेव्हा ही मुलगी डॉक्टरच्या नर्सिग होममध्ये गेली तेव्हा एक्सरे रुममध्ये डॉक्टरने तिचे अश्लिल फोटो काढल्याचाही आरोप तिने केला आहे. पोलिसांनी मुलीचा जबाब घेतल्यानंतर डॉक्टरला शुक्रवारी घरातून अटक केली.

First Published on September 7, 2014 3:35 am

Web Title: doctor held for rape minor patient in mulund
टॅग Rape