मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून तीन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू

मुंबई: करोनाचा वाढता संसर्ग आणि उपचाराची अधिक गरज पाहता रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार पश्चिम व मध्य रेल्वेने रेल्वे रुग्णालय, दवाखानात म्डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांच्या कं त्राटी पद्धतीने भरती के ली जाईल, अशी माहती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सध्या पश्चिम रेल्वेने मुंबईतील जगजीवनराम रुग्णालय करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी दिले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील ओपीडी मुंबई सेन्ट्रल येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकीय कार्यालयाजवळ हलवण्यात आली आहे. मात्र एवढय़ावरच न थांबता करोनाचा वाढता प्रसार व धोका पाहता सज्ज राहण्याचा निर्णय घेतला. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मुंबई विभागातील रेल्वे रुग्णालय, दवाखान्यात जादा मनुष्यबळाची कं त्राटी पद्धतीने भरती के ली जात आहे. मध्य रेल्वेकडून मुंबई विभागात १७० विविध पदे भरली जात असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी इत्यादींचा समावेश आहे. त्यांची भरती प्रक्रि या जरी सुरू झाली असली तरी जेव्हा त्यांची गरज भासेल तेव्हा त्यांना रुजू होण्यास सांगितले जाईल. सध्या भरतीची प्रक्रि याच पूर्ण के ली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वेही चार डॉक्टर आणि १८ परिचारिकांची भरती करत आहे. याशिवाय अन्य कर्मचारीही भरले जातील. परिचारिकांच्या भरतीसाठी २१ एप्रिलला मुलाखत घेण्यात येणार आहे. ही मुलाखत दूरध्वनीमार्फत घेतली जाईल, अशी माहिती दिली. डॉक्टरसाठी एमबीबीएसची अट असून परिचारिके साठी बी.एस्सी. किं वा मान्यताप्राप्त शाळा किं वा संस्थेतील जनरल परिचारिका अनुभव पाहिजे. महिन्याला ३५ हजार ४०० रुपये वेतन मिळेल, तर डॉक्टरांना महिन्याला ७५ हजार रुपये मिळतील.