डॉक्टरांच्या विविध मागण्या आश्वासने देऊनही पूर्ण होत नसल्याने डॉक्टरांनी १ जुलै या जागतिक डॉक्टर दिनी सामूहिक राजीनामे देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आरोग्यसेवा ठप्प होण्याची भीती आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून (मॅग्मो) डॉक्टरांच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने होत आहेत. जूनमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर दोन आठवडे उलटून गेल्यावरही त्याबाबत कोणतेही सकारात्मक पाऊल पडले नसल्याने राज्यातील डॉक्टर सामूहिक राजीनामे देणार आहेत, असे मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी सांगितले.