27 January 2021

News Flash

जिममधील कर्मचाऱ्यांना धमकावले, या अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल

व्यायाम शाळेतील कर्मचारी तसेच इतर लोकांना त्रास देणे आणि धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

अभिनयापेक्षा वादामुळे चर्चेत राहणारी बिग बॉस फेम अभिनेत्री डॉली बिंद्राविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यायाम शाळेतील कर्मचारी तसेच इतर लोकांना त्रास देणे आणि धमकावल्याप्रकरणी डॉली बिंद्राविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉली बिंद्राला लवकरच नोटीस बजावण्यात येणार असून तिची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

अभिनेत्री डॉल बिंद्रा ही वादामुळे नेहमीच चर्चेत असते. आता खार पोलीस ठाण्यात डॉलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यायाम शाळेतील कर्मचारी तसेच इतर लोकांना त्रास देणे आणि धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमण करणे, अब्रूनुकसानीकारक मजकूर वितरित करणे, धमकी देणे, शांतताभंग करणे अशा विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉली बिंद्राविरोधात यापूर्वी राधे माँने देखील कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. बिंद्राला नोटीस देऊन लवकरच खार पोलीस चौकशी करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 2:52 pm

Web Title: dolly bindra booked for threatening gym employee khar police station
Next Stories
1 वाईन मागवून प्राध्यापक शिकला ऑनलाइन फसवणुकीचा धडा
2 शिवसेनेचे दबावतंत्र? चंद्राबाबूंच्या नवी दिल्लीतील उपोषणाला पाठिंबा
3 भाजपचा महिनाभर प्रचार कार्यक्रम
Just Now!
X