पाच महिने होऊनही आयोगाचा निकाल नाही
‘पशुधन विकास अधिकारी’ (वर्ग१) पदासाठी ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोगा’ने (एमपीएससी) मुलाखती घेऊन पाच महिने झाले तरी निकाल जाहीर न झाल्याने राज्यभरातील उमेदवार हवालदील झाले आहेत.
२० जानेवारी, २०१२ रोजी पशुधन विकास अधिकारी पदाच्या २२४ जागांकरिता एमपीएससीने जाहिरात दिली होती. ३०जून, २०१२ ला या पदाकरिता चाळणी परीक्षा घेण्यात आली. तर २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान चाळणी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती एमपीएससीने घेतल्या. यास पाच महिने झाले तरी आयोगामार्फत निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.
दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पशुवैद्यकांची सध्या नितांत गरज आहे. महाराष्ट्रात पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या इतक्या जागा रिक्त असताना या निकालाचे गांभीर्य आयोगाला नाही, अशा शब्दांत एका उमेदवाराने नाराजी व्यक्त केली