23 January 2020

News Flash

डोंबिवलीतल्या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

सविता नाईक असं या तरुणीचं नाव आहे

डोंबिवलीहून सुटलेल्या सीएसएमटी फास्ट लोकलमधून एक तरुणी खाली पडून तिचा मृत्यू झाला. सविता नाईक असं या तरुणीचं नाव आहे. ती ३० वर्षांची होती, कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून या तरुणीचा मृत्यू झाला. घटनास्थळी जीआरपीची टीम दाखल झाली आहे. या तरुणीचा मृतदेह डोंबिवलीत आणण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली या स्थानकांवर कायमच गर्दी होते. डोंबिवलीत तर जलद लोकलमध्ये पिक अवर्समध्ये चढणं हे एक दिव्य असतं. अशा गर्दीच्यावेळीच लोकलमधून पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच मृत्यूही झाले आहेत. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. एका तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. अत्यंत दुर्दैवी अशीच ही घटना आहे. घटनास्थळी जीआरपीचं पथक दाखल झालं आहे. सविता नाईक असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. या तरुणीचा मृतदेह डोंबिवलीत आणला जाणार आहे.

First Published on July 22, 2019 11:00 am

Web Title: dombivli girl fallen from local and dies scj 81
Next Stories
1 सरकारने देशाची प्रतिष्ठा उंचावली!
2  ‘धार्मिक हिंसाचारातील पीडितांचा संघर्ष मोठा’
3 कुलाब्यातील ‘चर्चिल चेंबर’ला आग
Just Now!
X