डोंबिवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी तोडफोड केल्याप्रकरणी रेल्वे न्यायालयाने चार जणांना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तोडफोड प्रकरणी रेल्वे पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्यापैकी एक जण या तोडफोडीत असल्याचा पुरावा न आढळल्याने त्याला निदरेष सोडण्यात आले.  या चार आरोपींना न्यायालयाने त्यांना सोमवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींमध्ये दोघे डोंबिवलीचे, एक कर्जत तर एकजण आंबिवलीचा आहे.  
शुक्रवारी सकाळी दिवा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको आणि दगडफेक करून स्थानकातील मालमत्तेचे नुकसान केले होते. तेच लोण डोंबिवली रेल्वे स्थानकात पसरले. दोन-तीनशे प्रवाशांच्या जमावाने रेल्वे स्टेशन मास्तरांच्या दालनात घुसून त्यांनी घोषणाबाजी करीत तेथील साहित्याची मोडतोड केली. या सर्व तोडफोडीत रेल्वेचे सुमारे नऊ लाख रूपयांचे नुकसान झाले.