News Flash

डॉन छोटा शकीलच्या मोठ्या बहिणीचा करोनामुळे मृत्यू

मागच्याच महिन्यात शकीलच्या लहान बहिणीचेही निधन

संग्रहित

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याच्या मोठ्या बहिणीचा म्हणजेच हमीदाचा मृत्यू करोनामुळे झाल्याचं वृत्त आहे. याआधी त्याच्या छोट्या बहिणीचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. धाकट्या बहिणीच्या मृत्यूला एक महिना लोटण्याआधीच हमीदाचा मृत्यू झाला. हमीदा सय्यदचा मुंब्रा येथील रुग्णालयात मंगळवारी पहाटे मृत्यू झाला.

हमीदा सय्यदवर गेल्या आठवड्यापासून करोनाचे उपचार सुरु होते.छोटा शकीलची धाकटी बहीण फहमिदा हिचा २० मे रोजी मीर रोड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तिचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मुंबई मिररने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 7:15 pm

Web Title: don chhota shakeels elder sister hameeda dies due to covid 19 scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बदला घ्या, बलिदान वाया जाता कामा नये – असदुद्दिन ओवेसी
2 अमेरिकेत २५ फूटांची, ३० हजार किलो वजनाची हनुमानाची मूर्ती विराजमान
3 “…त्यातून रोजगाराच्या नव्या संधी तयार होतील”; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन
Just Now!
X