मुंबई महापालिका म्हणते की आज रात्री ११ वाजता पार्टी संपवू नका. पण नव्या वर्षाचे स्वागत घरीच करा. उपहारगृहांना (रेस्तराँ) रात्री ११ नंतर घरपोच सेवा देण्याची अनुमती देण्यात आली आहे. मुंबईत सुरक्षितरित्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी करोनाविषयक सुनिश्चित नियमांचे पालन करा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. करोना नियमांचं पालन करुन सर्व नियमांचं पालन करावं असंही आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे मुंबईत रात्री ११ नंतर पार्टी संपवू नका. नूतन वर्षाचे स्वागत घरीच करा. आता उपहारगृहांना रात्री ११ नंतर होम डिलिव्हरी करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत ३१ डिसेंबरला पार्टी करत असाल तर रात्री ११ नंतरही तुम्ही खाद्यपदार्थ मागवू शकता असं आता मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.

करोनाच्या काळात ३१ डिसेंबर आलेला आहे. ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अशात आता आज ३१ डिसेंबरला मुंबई महापालिकेने रात्री ११ नंतर रेस्तराँना होम डिलिव्हरीसाठी संमती दिली आहे.