अभिनेता शाहरूख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘दिलवाले’ चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने पाहू नये, असे आवाहन मनसेने सोमवारी केले. शाहरूख खानने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी काहीही मदत केली नाही. त्यामुळे त्याचा चित्रपट न पाहता ते पैसे अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ फाऊंडेशनला द्यावेत, असेही आवाहन पक्षाने केले आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा दिलवाले चित्रपट अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
चेन्नईमधील पूरग्रस्तांसाठी शाहरूखने नुकतीच एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, राज्यात यंदा भीषण दुष्काळ असताना दुष्काळग्रस्तांसाठी त्याने काहीही मदत केली नाही. त्यामुळेच त्याचा चित्रपट पाहू नये, असे आवाहन मनसेने केले आहे. प्रेक्षकांनी ते पैसे नाम फाऊंडेशनला द्यावेत, जेणेकरून दुष्काळग्रस्तांना मदत होईल, असेही पक्षाने म्हटले आहे.