29 March 2020

News Flash

‘अन्नधान्याची चिंता नको, सहा महिने पुरेल इतका साठा’

विदर्भातील धान खरेदीसाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत ३१ मे २०२० पर्यंत

संग्रहित छायाचित्र

राज्यात सहा महिने पुरेल इतका अन्नधान्याचा साठा असल्याने लोकांनी चिंता करू नये. अन्नधान्याची कोणी साठेबाजी व काळाबाजार के ल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई के ली जाईल, असा इशाराही अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिला. त्याचबरोबर विदर्भातील धान खरेदीसाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत ३१ मे २०२० पर्यंत वाढवण्यात येत असल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली.

महाराष्ट्र बंदची अधिसूचना राज्य सरकारने काढल्यानंतर राज्यातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेतला. राज्यातील जनतेला सहा महिने पुरेल इतका मुबलक अन्नधान्याचा साठा उपलब्ध असल्याची आकडेवारी यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात अन्नधान्याचा मुबलक साठा आहे. त्याचबरोबर भाजीपाला, फळे, चिकन-मटण-मासे आदींच्या विक्रीवर बंदी नाही. के वळ गर्दी होणार नाही अशारितीने विक्रेत्यांनी त्यांची विक्री करायची आहे. आता शेतकऱ्यांवरही भाजीपाला बाजार समितीतच आणून विकण्याचे बंधन नाही. ते स्वतंत्रपणे विकू  शकतात. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बाजार समितीमधील व्यवहार बंद राहिले तरी भाजीपाला लोकांना उपलब्ध होण्यात अडचण नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ही  मुदत ३१ मे पर्यंत वाढवून देण्यास केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या मुदतीमुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भात यंदाच्या वर्षी धानाचे मोठय़ा प्रमाणात उत्पन्न झाले.त्याचप्रमाणे राज्य सरकारने धानासाठी १८०० रुपये हमीभाव आणि त्यावर ७०० रुपये बोनस दिला. शासकीय खरेदी केंद्रावर चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांकडे पाठ फिरवली होती. शेतकरी मोठय़ा प्रमाणात धान शासनाच्या खरेदी केंद्रावर घेऊन येत होते.मात्र कोरोनामुळे त्यांची गैरसोय झाली होती. सरकारची धान खरेदी ३१ मार्च २०२० पर्यंत सुरू राहणार होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांकडे मोठय़ा प्रमाणात धान उपलब्ध असल्याने तसेच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ही मुदत अधिक वाढवून मिळावी यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडून धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या मध्यस्थीने केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे मागणी केली होती.

त्यानुसार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत विदर्भातील धान खरेदीसाठी ३१ मार्च पर्यंत असलेली मुदत दोन महिन्यांनी वाढवून देत ती ३१ मे पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 1:09 am

Web Title: dont worry about food stocks lasting six months abn 97
Next Stories
1 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात
2 ‘दांडुक्याचा धाक दाखवा, पण सामान्यांवर वापर नको’
3 ‘सीईटी’च्या वेळापत्रकात बदल
Just Now!
X