१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली. अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि मोहन जोशी या दोघांनीच अर्ज दाखल केले होते. यामध्ये पटेल यांनी बाजी मारली.

डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांच्या अर्जांवर नाट्य परिषदेच्या कार्यक्रारी समितीत चर्चा झाली त्यानंतर पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली. १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

Accused arrested from Pune who killed a BJP official in Karnataka pune news
कर्नाटकातील भाजप पदाधिकाऱ्याचा खून; पुण्यातून आरोपी अटकेत
Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
sharad pawar
‘गोविंदबागे’त जेवायला या! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण!
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

डॉ. जब्बार पटेल यांनी आजवर अनेक नाटकं आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून यामध्ये जैत रे जैत, मुक्ता, सामना, सिंहासन, एक होता विदूषक यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. त्याचबरोबर राज्य शासनाची निर्मिती असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला. प्रायोगिक नाट्य चळवळीसाठी त्यांनी थिएटर अकादमी ही संस्थाही स्थापन केली आहे.

जब्बार पटेल यांना अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे प्रतिष्ठित विष्णुदास भावे पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर दिल्लीतील संगित नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.