News Flash

शिक्षण शुल्क समितीवर डॉ. महाजन नियुक्त

उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने या समितीच्या सचिवपदी राज्याच्या डॉ. महाजन यांची नियुक्ती केली.

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची ढासळणारी स्थिती एकीकडे, तर दुसरीकडे याच संस्थांना मोठय़ा प्रमाणात फी वाढविण्यासाठी मिळणारी परवानगी यातून विद्यार्थी संघटना तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये मोठय़ा प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. ‘शिक्षण शुल्क समिती’बाबत मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन अखेर उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने या समितीच्या सचिवपदी राज्याच्या तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु.का. महाजन यांची नियुक्ती केली.

‘शिक्षण शुल्क समिती’च्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर झालेल्या बैठकीत समितीचा कारभार पारदर्शक करण्यासाठी संगणकीकरण करून सर्व महाविद्यालये व संस्थांकडून येणारी माहिती वेबसाइटवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2016 12:08 am

Web Title: dr mahajan appointed on education fees committee
Next Stories
1 मंत्र्यांसाठी बायोमेट्रिक जीपीएस सिस्टिम बसवा – राष्ट्रवादीची मागणी
2 दिघ्यातील अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार
3 प्रजन्या कदम आणि राजस लिमये पहिल्या ‘ब्लॉगबेंचर्स’चे मानकरी
Just Now!
X