विद्यापीठाच्याकुलगुरू पदासाठीच्या पात्र उमेदवारांमध्ये डॉ. राजन वेळूकर यांच्या नावाचा समावेश करताना संशोधन समितीने सारासार विचार केला नव्हता, असा निष्कर्ष नोंदवणारा निकाल उच्च न्यायालयाने दिला. परंतु या निकालात न्यायालयाने आपल्या वकिलांनी केलेला महत्त्वाचा युक्तिवाद नमूदच केलेला नाही, असा दावा करत त्याबाबत स्पष्टीकरण मागणाऱ्या डॉ. वेळूकर यांचे वकील हजर न झाल्याने मंगळवारी प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. शिवाय निकालातील नेमक्या कोणत्या भागाबाबत स्पष्टीकरण हवे यासाठी त्यांनी तपशीलवार अर्जही केला आहे. निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यापूर्वी हा निकाल देणाऱ्या खंडपीठाकडून निकालांमधील काही बाबींबाबत आपल्याला स्पष्टीकरण हवे असल्याचा दावा डॉ. वेळूकर यांनी केला आहे.