07 August 2020

News Flash

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चेला उधाण

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय देशमुख यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली.

| July 22, 2015 12:56 pm

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय देशमुख यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. देशमुख यांच्या ‘राज’भेटीमुळे विविध तर्क लढवले जात आहेत. मात्र, राज ठाकरेंची भेट ही राजकीय संदर्भातील नसून विद्यापीठातील पारदर्शकता आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने भेटीगाठी सुरू असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहू नये फक्त राज यांचीच नव्हे तर येत्या काळात उद्धव ठाकरेंसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांची भेट घेणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.
देशमुख यांची गेल्याच महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे. मावळते कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांचा कार्यकाळ ६ जुलैला संपुष्टात आल्यानंतर ७ जुलैपासून देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाचा कार्यभार हाती घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2015 12:56 pm

Web Title: dr sanjay deshmukh meets raj thackeray
टॅग Raj Thackeray
Next Stories
1 अतिक्रमणावरून ताज हॉटेलला ६ कोटींचा दंड
2 शाळेवर हलगर्जीपणाचा गुन्हा
3 हिटलर संबोधनावरून महापौरांना भाजप नगरसेवकांचा दणका
Just Now!
X