आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शशिकला वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.

एप्रिल महिन्यात राजस्थान उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. जगदीश भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूच्या निवडीसाठी त्रिसदस्यीय निवड समिती गठित केली होती.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Neha Hiremath and Accused Fayaz
काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

टाटा समाज विज्ञान संस्थेचे निदेशक डॉ. एस. परशुरामन व महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी राजभवन येथे पार पडल्या. यानंतर राज्यपालांनी शनिवारी डॉ. वंजारी यांचे नाव कुलगुरूपदी जाहीर केले. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. डॉ. वंजारी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभाग येथे विभागप्रमुख आहेत. त्यांनी रा. तु. म. नागपूर विद्यापीठातून जीवरसायनशास्त्र विषयात एम.एस्सी., तसेच इंग्रजी व शिक्षणशास्त्र विषयात पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या आहेत.तसेच शिक्षण विषयात पीएच.डी.ही प्राप्त केली आहे.