News Flash

नालेसफाईत एक हजार कोटींचा गैरव्यवहार – शेलार

मुंबईत सुमारे २५२.७४ किमी लांबीचे एकूण १७० मोठे नाले, छोटे नाले, गटारे व नलिकांच्या सफाईसाठी दरवर्षी सुमारे १५० कोटींपेक्षा जास्त निधी दिला जातो.

संग्रहित

मुंबई : पहिल्या मोसमी पावसातच मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईची दाणादाण उडाली. नालेसफाईच्या कंत्राटांमध्ये गेल्या पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी बुधवारी केला.
मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबले आहे, नागरिकांच्या घरात घुसले आहे. नालेसफाई १०७ टक्के झाल्याचे दावे करण्यात आले असले, तरी कंत्राटांमध्ये कमिशन घेतल्याचे या परिस्थितीवरून उघड झाले आहे, असा आरोप शेलार यांनी केला.
मुंबईत सुमारे २५२.७४ किमी लांबीचे एकूण १७० मोठे नाले, छोटे नाले, गटारे व नलिकांच्या सफाईसाठी दरवर्षी सुमारे १५० कोटींपेक्षा जास्त निधी दिला जातो. नालेसफाईच्या गाळाचे मोठमोठे आकडे दिले जातात, पण किती गाळ काढला, त्याच्या वजनाच्या पावत्या, कुठे टाकला, त्याचे सीसीटीव्ही फुटेज, असे कोणतेही पुरावे मागूनही कधीच दिले जात नाहीत, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 2:28 am

Web Title: drain cleaning bjp mla ashish shelar akp 94
Next Stories
1 मुंबईत पहिल्याच पावसाचा कहर!
2 ‘क्यूएस’ क्रमवारीत मुंबई आयआयटी
3 राज्यपालांच्या नकारानंतरही थेट भरतीसाठी धडपड
Just Now!
X