News Flash

CID फेम अभिनेत्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने विलेपार्ले स्थानकात निधन

कामगार कल्याणच्या नाट्य स्पर्धांमधून पुढे आलेला अभिनेता म्हणून दिनेश साळवी यांना ओळखले जायचे.

संग्रहित छायाचित्र

नाट्य कलाकार दिनेश साळवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. विलेपार्ले स्थानकात ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सीआयडी या मालिकेतही त्यांनी काम केले होते.

कामगार कल्याणच्या नाट्य स्पर्धांमधून पुढे आलेला अभिनेता म्हणून दिनेश साळवी यांना ओळखले जायचे. तुझी चाल तुरु तुरु अशा नाटकासह सीआयडी या मालिकेतही त्यांनी काम केले. दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता म्हणून त्यांनी मनोरंजन क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली.  आदेश बांदेकर यांचे ते चांगला मित्र देखील होते. काही दिवसांपूर्वीच आदेश बांदेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या प्रसंगी दिनेश साळवी देखील तिथे उपस्थित होते.

बुधवारी दिनेश साळवी हे विलेपार्ले स्थानकात आले होते. स्थानकात आल्यावर त्यांना छातीत दुखू लागले. ते काही वेळ एका बाकड्यावर बसले. या बाकड्यावरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदविकाराच्या झटक्याने साळवी यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 10:41 am

Web Title: drama artist dinesh salvi dies at vile parle station due to heart attack
Next Stories
1 मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आज दोन तास बंद
2 प्रवाशावर हात उगारणाऱ्या रिक्षाचालकाला मनसे कार्यकर्त्यांचा दणका
3 उद्योगासाठी दिलेली सरकारी जमीन इमारतींसाठी खुली
Just Now!
X