News Flash

चित्रपट, नाटकांची ऑनलाईन तिकिटे महागणार

चित्रपट, नाटक वा अन्य करमणुकीच्या कार्यक्रमाच्या ऑनलाईन तिकिट विक्रीवर करमणूक कर लावण्यात येणार आहे.

| January 15, 2015 03:20 am

चित्रपट, नाटक वा अन्य करमणुकीच्या कार्यक्रमाच्या ऑनलाईन तिकिट विक्रीवर करमणूक कर लावण्यात येणार आहे. या संदर्भात विधिमंडळात मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्र करमणूक शुल्क सुधारणा विधेयकाला राज्यपालांनी मान्यता दिली आहे. त्याच्या अंमलबजावणीची अधिसूचना शासनाने काढली आहे.  सध्या चित्रपट, नाटक व अन्य करमणुकीच्या कार्यक्रमाच्या तिकिटांची मोठय़ाप्रमाणावर ऑनलाईन विक्री होते. त्यासाठी संबंधित चित्रपटगृह, नाटय़गृहाच्या मालकाकडून किंवा एजन्सींकडून ऑनलाईन तिकिटावर सेवा कर आकारला जातो. आता दहा रुपयापेंक्षा अधिक सेवा कर असेल तर त्यावर करमणूक कर लागू करण्यात येणार आहे. सुधारीत कायद्यात तशी तरतूद करण्यात आली आहे. त्याचे दर वेळोवेळी ठरविले जाणार आहेत. राज्य शासनाला त्यातून काही महसूल मिळणार आहे. मात्र त्यामुळे तिकिटाचे दरही वाढण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 3:20 am

Web Title: drama movie online ticket expensive
Next Stories
1 स्वबळावर लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
2 दोन निवडणुकांच्या दोन भिन्न तऱ्हा
3 ‘सौंदर्य प्रसाधने सीलबंदच हवीत’
Just Now!
X