News Flash

कोकेन तस्करांचे भारतीय साथीदार गजाआड

महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) तीन दिवसांत मुंबई, नवी मुंबई आणि उदयपूर येथे कारवाई करून कोकेन तस्करांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचे भारतीय हस्तक गजांआड केले.

डीआरआयची मुंबई, नवी मुंबई, उदयपूर येथे तीन दिवस कारवाई

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) तीन दिवसांत मुंबई, नवी मुंबई आणि उदयपूर येथे कारवाई करून कोकेन तस्करांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचे भारतीय हस्तक गजांआड केले. यात मुंबईतील दोन महिलांचा समावेश असून नवीमुंबई येथून दोन आफ्रि कन तरुणांना अटक करण्यात आली. या कारवाईत अर्धा किलो उच्च प्रतिचे कोके न हस्तगत करण्यात आले. हा साठा इस्त्रीत दडवून एअर कागरेद्वारे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर काढण्याची धडपड या टोळीकडून सुरू होती.

डीआरआय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्रिनिदाद-टोबॅगो येथून इस्त्रीचे पार्सल एअर कागरेमार्फत मुंबई विमानतळावर पाठविण्यात आले असून त्यात कोके नचा साठा आहे, अशी नेमकी माहिती उपलब्ध झाली होती. त्याआधारे पार्सल विमानतळावर उतरताच झाडाझडती घेण्यात आली. तेव्हा इस्त्रीत दडविण्यात आलेला सुमारे अर्धा किलो कोके न साठा आढळला. तो हस्तगत करण्याऐवजी हे पार्सल घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीसाठी सापळा रचण्यात आला.  हे पार्सल घेण्यासाठी संबंधीत कु रिअर कं पनी कार्यालयात आलेल्या मुंबईतील महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. हे पार्सल नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या दोन आफ्रि कन तरुणांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तिच्यावर होती, अशी माहिती डीआरआय अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार नवीमुंबईत सापळा रचण्यात आला. कोके न साठा घेण्यासाठी महिलेकडे आलेल्या आफ्रि कन तरुणाला ताब्यात घेण्यात आले. हा प्रसंग पाहून त्याचा साथीदार रिक्षातून पसार झाला. त्यालाही पाठलाग करून पकडण्यात आले. तिघांच्या चौकशीतून उदयपूर येथील एका रिसॉर्टवर थांबलेल्या मुंबईतील दुसऱ्या महिलेला डीआरआयच्या गुजरात पथकाने अटक केली. या दोन्ही महिलांना अंमलीपदार्थाची वाहतूक, तस्करीप्रकरणी पोलिसांनी याआधी अटक केली होती, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

या टोळीने गेल्या चार महिन्यात अशाप्रकारे सुमारे तीन किलो(२० कोटी रुपये) कोके न भारतात मागवून वितरीत के ल्याची माहिती डीआरआयला मिळाली आहे. या कारवाईत हस्तगत के लेल्या कोके न साठय़ाची किं मत तीन कोटी रुपये असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

त्रिनिदादहून हे कोके न भारतात येत असल्याने या कारवाईला ऑपरेशन कॅ लिप्सो असे सांके तिक नाव देण्यात आले होते. कॅलिप्सो हा त्रिनिदाद, टोबॅगो बेटांवरील पारंपारिक संगीत प्रकार असल्याचे डीआरआय अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:57 am

Web Title: dri action cocaine smuggling arrested in mumbai and suburbs dd70
Next Stories
1 बनावट मद्याविरोधातील कारवाईला धार
2 चेंबूरच्या वाशी नाक्यावरील कोंडी सुटणार?
3 दूतावासाला धमकीचे पत्र पाठवणारा तरुण अटकेत
Just Now!
X