News Flash

मुंबईकर सुधारले!

सरत्या वर्षांचा निरोप घेत नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी बेधुंद होणारे मुंबईकर यंदा एका बाबतीत मात्र सुधारले होते!

| January 2, 2015 02:52 am

सरत्या वर्षांचा निरोप घेत नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी बेधुंद होणारे मुंबईकर यंदा एका बाबतीत मात्र सुधारले होते! बेधुंद होऊन गाडी चालवण्याच्या गुन्ह्य़ांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. यंदा ३१ डिसेंबरच्या उत्तररात्री मद्यपान करून वाहने चालवण्याच्या गुन्ह्य़ांखाली ५२३ जणांना अटक करण्यात आली. गेल्या वर्षी ही संख्या ५६८ होती. ठाण्यात मात्र ही संख्या शंभरने अधिक भरली आहे.mu02
पोलिसांनी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. मालाड, कांदिवली, बोरिवली, विमानतळ, विक्रोळी, मुलुंड, चेंबूर अशा विविध ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात होते. तसेच मद्यधुंद वाहनहाकाटीविरोधात पोलिसांनी जनजागृतीही मोठय़ा प्रमाणात केली होती. त्याचे परिणाम यावेळी दिसून आले. ५२३ पैकी ३९२ गुन्हे २१ ते ३५ वयोगटांतील तरुणांवर नोंदवण्यात आले आहेत. यातील १३७ गुन्हे २१ ते २५ वयोगटांतील तरुणांवर दाखल झाले आहेत, तर २६ ते ३० या वयोगटात १४९ आणि ३१ ते ३५ वयोगटात १०६ गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांनी ४०७ गाडय़ा जमा केल्या असून १४८ वाहन चालकांकडे वाहन परवानाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाण्याचा ‘विक्रम’..
सरत्या वर्षांला अखेरचा निरोप तसेच नववर्ष स्वागतानिमित्ताने बुधवारी रात्री मद्यप्राशन करून  वाहन चालविणारे ६२० तळीराम ठाणे वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून या तळीरामांची झिंग उतरवली आहे. गेल्या वर्षी ३१० मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मद्यपी चालकांचा आकडा दुपटीने वाढल्याचे दिसून येते. तसेच भरधाव वाहन चालविणे, दुचाकी चालविताना हेल्मेट नसणे आणि इतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका रात्रीत एकूण अडीच हजार चालकांवर कारवाई झाली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.
पश्चिम उपनगरांची ‘आघाडी’
मद्यधुंद होऊन गाडी चालवण्याचे सर्वाधिक म्हणजे ५७ गुन्हे मालाडमध्ये नोंदवण्यात आले. त्या खालोखाल कांदिवली (३८), बोरिवली (३७), डी. एन. नगर (३५), विमानतळ (३७), विक्रोळी (३०) यांचा क्रम लागला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 2:52 am

Web Title: drink and drive cases reduced in mumbai this year
Next Stories
1 ७९ डॉक्टरांना नोटीस
2 वातानुकूलित डबलडेकर गाडीचा कोकणाला अलविदा?
3 ‘मद्य’प्राशनाचे गुपित गुलदस्त्यातच!
Just Now!
X