23 January 2020

News Flash

अल्पशिक्षित वाहन चालक नकोच!

व्यावसायिक वाहनांसाठी आठवी उत्तीर्ण अट रद्द करण्याचा केंद्राचा विचार

|| सुशांत मोरे

परिवहन आयुक्त कार्यालयाचा अभिप्राय; व्यावसायिक वाहनांसाठी आठवी उत्तीर्ण अट रद्द करण्याचा केंद्राचा विचार

प्रत्येक चालकाला किमान वाचता, लिहिता येणे आवश्यक आहे. त्यामुळे चालक हा अल्पशिक्षित नकोच, अशी स्पष्ट भूमिका परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्य शासनाकडे मांडली आहे.

अशिक्षित बेरोजगारांना चालक म्हणून दळणवळण व वाणिज्य क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी असलेली आठवी पास अट रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर देशभरातील प्रत्येक राज्याकडून अभिप्राय, हरकती मागवण्यात येत असून महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्तालयाने मात्र सुशिक्षित चालकच हवा यासाठी पुढाकार घेतला आहे.

रिक्षा, टॅक्सी, बसगाडय़ा, टेम्पो, कंटेनर यांसह अन्य वाणिज्य वाहन चालवण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ (८) अंर्तगत चालकासाठी आठवी पास अट आहे. परंतु या अटींमुळे सध्या गेल्या काही वर्षांत दळणवळण व वाणिज्य क्षेत्रात कमी वाहन चालक मिळत आहेत. जवळपास २२ लाख चालकांची या क्षेत्राला गरज असल्याचे सांगितले जाते. आठवी पास अट रद्द झाल्यास जास्तीत जास्त चालक मिळतील, अशी अपेक्षा आहे. तसेच अशिक्षित बेरोजगारांनाही नोकरीची संधी उपलब्ध होईल, या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने आठवी पास अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा नवीन नियम लागू करण्यापूर्वी केंद्राकडून देशभरातील परिवहन विभाग, सामाजिक संस्था व जनतेकडून गेल्या एक ते दीड महिन्यांपासून हरकती व सूचना मागवण्यात येत आहेत. त्याला राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयानेही उत्तर दिले आहे. परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यातील छोटे-मोठे रस्ते, महामार्ग यावरील वाहतूक नियम नमूद केलेले फलक मराठी, हिंदी, इंग्रजीतून असतात. त्यामुळे चालकाला ते वाचता आले पाहिजे. जेणेकरून त्या नियमांचे चालक पालन करू शकतो. वाहनांशी संबंधित कागदोपत्री व्यवहार करतानाही त्याला लिहिता येणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा गैरफायदा कोणी घेऊ  शकत नाही, यासह अन्य काही कारणांमुळे चालक हा सुशिक्षितच असावा, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे व तसे पत्र शासनाला दिले आहे. शासनाकडूनही लवकरच आपली भूमिका केंद्र सरकारला कळवण्यात येणार आहे.

First Published on July 21, 2019 1:19 am

Web Title: driving licence maharashtra state transportation commissionerate mpg 94
Next Stories
1 राज्यात बुलेट ट्रेनचे काम धिम्या गतीने
2 मुंबईसह राज्यभर पावसाचे पुनरागमन
3 दहा रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट
Just Now!
X