23 October 2020

News Flash

चित्रनगरीजवळून ‘एमडी’ हस्तगत

आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न, मारहाणीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके  चित्रनगरी परिसरात एमडी या अत्यंत घातक अंमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नूरमहोम्मद खान (२२) या तरुणाला गुन्हे शाखेने अटक के ली. त्याच्याकडून सुमारे अर्धा किलो एमडी हस्तगत करण्यात आले. या साठय़ाची किं मत सुमारे १५ लाख असल्याचे सांगण्यात आले. गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे उपनिरीक्षक वाहिद पठाण यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने चित्रनगरीकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला. संशयास्पद हालचालींवरून पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. झाडाझडतीत  त्याच्या ताब्यात एमडीचा साठा असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न, मारहाणीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी घाटकोपर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या दोन गुन्ह्य़ांमध्ये त्याचा शोध सुरू होता, असे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2020 2:04 am

Web Title: drug peddler held in mumbai zws 70
Next Stories
1 अन्य नोकरदारांनाही रेल्वे प्रवासाची मुभा हवी!
2 प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
3 मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता वाढीव गुण
Just Now!
X