News Flash

गणेशोत्सवामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार ३१ ऑगस्टपर्यंत

एस.टी. महामंडळात तब्बल एक लाख कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या सात तारखेला होते.

(संग्रहित छायाचित्र)

येत्या २ सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होत असल्यामुळे एस.टी.मधील कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन ३१ ऑगस्टपर्यंत देण्याचे आदेश परिवहनमंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एस.टी. प्रशासनाला दिले आहेत.

एस.टी. महामंडळात तब्बल एक लाख कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या सात तारखेला होते. यंदा २ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाची पूर्वतयारी करता यावी यासाठी एक आठवडा अगोदरच ऑगस्टचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दिवाळी, ईद आदी उत्सवांनिमित्त कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित तारखेच्या आधी देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:37 am

Web Title: due to ganeshotsav the salary of st employees till august 31st abn 97
Next Stories
1 डॉक्टरने उपचारास नकार दिल्याने वैद्यकीय अहवाल देणे अशक्य!
2 रेल्वेवरील दगडफेकीच्या ११८ घटनांपैकी २१ प्रकरणांचीच चौकशी
3 उद्योग क्षेत्रात आघाडी घेण्याची महाराष्ट्राला सुवर्णसंधी!
Just Now!
X