“दुष्काळ मदतीचे वाटप व्यवस्थित व्हावे यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या सात-बाराला जोडावा”, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

दुष्काळ व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक पार पडली यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ जाहीर करण्याबाबतच्या निकषांमध्ये लवचिकता असणे गरजेचे आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या माहितीची आधार क्रमांकाशी जोडणी होणार आहे. या शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची जोडणी सात-बाराशीही करण्यात यावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत दुष्काळी मदतीचे व्यवस्थित वितरण करता येईल.

दुष्काळाच्या अनुषंगाने सर्व्हेक्षणांतर्गत पीक पाहणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याच्याही सूचना त्यांनी संबंधीतांना दिल्या. काही जिल्ह्यातील मोठ्या धरणात इतर जिल्ह्यात झालेल्या मोठ्या पावसाचे पाणी आल्याने पाणीसाठा समाधानकारक वाटतो. मात्र, प्रत्यक्षात धरणातील पाणीसाठा अधिक असलेल्या जिल्ह्यात पाऊस कमी असतो. अशा जिल्ह्यात जमिनीतील पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन दुष्काळाच्या अनुषंगाने कार्यवाही करता येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

[jwplayer ahfK5LyD]