29 September 2020

News Flash

खांदेश्वरमध्ये डंपरचालकाच्या हलगर्जीपणामुळे सायन पनवेल महामार्गावर विचित्र अपघात

अग्निशमन दलाचे जवान आल्यावर तब्बल एक तासाने संबंधित डंपरचालकाला खाली सुरक्षित उतरवण्यात आले

डंपरचालकाच्या हलगर्जीपणामुळे सायन पनवेल महामार्गावर एक विचित्र अपघात झाला. सायन पनवेल महामार्गावरून एक डंपर पनवेलच्या दिशेने जात असताना डंपरच्या मागे असलेले हायड्रोलिक जॅक नादुरूस्त राहिल्याने वरच राहिले. या मार्गाने जाणारे अनेक वाहनचालक संबंधित डंपर चालकाला डंपर थांबवण्याची सूचना करत होते. मात्र संबंधित डंपरचालक इतर वाहनचालकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत होता. भरधाव वेगात असलेला डंपर खांदेश्वर येथील नवीन उड्डाणपुलाच्या दिशादर्शकावर धडकला. धडक मोठ्या प्रमाणात असल्याने डंपरचा पुढचा भाग दिशादर्शकाच्या वरती आणि डंपरचे मागचा भाग जमिनीखाली टेकला.

अग्निशमन दलाचे जवान आल्यावर तब्बल एक तासाने संबंधित डंपरचालकाला खाली सुरक्षित उतरवण्यात आले. संबंधित डंपरचालक किरकोळ जखमी झाला असून या विचित्र अपघातानंतर खांदेश्वर येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे पनवेलच्या दिशेने जाणा-या वाहनांना कोंडीचा सामना करावा लागला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 11:52 am

Web Title: dumper accident at khandeshwar on sion panvel road scj 81
Next Stories
1 वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी कापला ५१ किलोंचा ‘ईव्हीएम’ केक
2 मालिका-चित्रपटांची शीर्षके हिंदी, प्रादेशिक भाषांमध्ये देणे बंधनकारक
3 आपले समाधान कशात आहे ते ओळखून क्षेत्र निवडा
Just Now!
X