मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी एक हजार ९२२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत असून १५ हजारांच्या पुढे गेली असून रुग्ण दुपटीचा कालावधी १५६ दिवसांपर्यंत खाली आला आहे.

मुंबईत एकूण बाधितांची संख्या ३ लाख ४७ हजार ५८१ झाली आहे, मृतांची संख्या ११ हजार ५३९ वर गेली आहे. तर एका दिवसात एक हजार २३६ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ३ लाख १९ हजार ७८७ म्हणजेच ९२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून सध्या १५ हजार २६३ रुग्ण उपचाराधीन आहेत. उपचाराधीन रुग्णांपैकी गंभीर रुग्णांची संख्या ४५० आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. सोमवारी १९ हजार  चाचण्या करण्यात आल्या. एकू ण चाचण्यांपैकी तब्बल दहा टक्क्यांहून अधिक अहवाल बाधित आले आहेत. आतापर्यंत ३५ लाख ९३ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर रोज वाढत असून तो ०.४५ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही १५६ दिवसांपर्यंत खाली गेला आहे.

ठाणे जिल्ह््यात १,३५९ नवे रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह््यात मंगळवारी १ हजार ३५९ करोना नवे रुग्ण आढळले, तर सहा जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. ठाणे जिल्ह््यात गेल्या तीन ते चार महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. जिल्ह््यातील बाधितांचा आकडा आता दोन लाख ७८ हजार ९२८ इतका झाला असून मृतांचा आकडा ६ हजार ३४९ इतका झाला आहे.  जिल्ह््यातील एक हजार ३५९ करोना रुग्णांपैकी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३८६, ठाणे महापालिका क्षेत्रात ३७०, नवी मुंबई २२५, मिरा भाईंदर १०७, ठाणे ग्रामीण ९८, बदलापूर ६८, अंबरनाथ ४५, उल्हासनगर ३७ आणि भिवंडीत २३ करोना रुग्ण आढळले, तर कल्याण डोंबिवली  तीन, ठाणे एक, नवी मुंबई एक आणि मिरा भाईंदरच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला.