X

उड्डाण घेताच मुंबई-अहमदाबाद ‘इंडिगो’ विमानाचा टायर फुटला, 185 प्रवासी थोडक्यात बचावले

मुंबईहून उड्डाण घेताच टायर फुटला होता

मुंबई विमानतळावरुन अहमदाबादकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचा टायर फुटल्याची घटना समोर आली आहे. टायर फुटल्यामुळे या विमानाचं एहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मुंबईहून उड्डाण घेताच टायर फुटला होता अशी माहिती आहे. विमानाच्या लँडिंगसाठी विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या विमानात 185 प्रवासी होते. सर्व 185 प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

इंडिगोचं 6 ई 361, ए-320 हे विमान काल संध्याकाळी मुंबईहून अहमदाबादसाठी निघालं. पण उड्डाण घेतानाच विमनाचा टायर फुटल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं. त्यानंतर वैमानिकाने तातडीने अहमदाबाद येथील एटीसीशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आणि इमर्जन्सी लँडिंग करण्याची परवानगी मागितली. अहमदाबाद एटीसीने विनंती तात्काळ मान्य करत लँडिगसाठी विशेष प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजून 21 मिनिटांनी अत्यंत काळजीपूर्वकपणे विमानाला अहमदाबाद येथील धावपट्टीवर उतरवण्यात आलं आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र हे विमान धावपट्टीवर रखडल्यामुळे काही वेळाकरता इतर विमानांचा खोळंबा झाला होता.