02 March 2021

News Flash

पर्यावरणस्नेही गणेशभक्तांचा सन्मान

प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या पर्यावरणासाठी घातक असणाऱ्या वस्तूंवर बंदी आल्याने गणेशभक्तांनी सण साजरा करण्याचे अनेक कल्पक मार्ग शोधून काढले आहेत

‘लोकसत्ता’तर्फे इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा

पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीही ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. ही स्पर्धा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर या विभागांत घेतली जाईल.

प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या पर्यावरणासाठी घातक असणाऱ्या वस्तूंवर बंदी आल्याने गणेशभक्तांनी सण साजरा करण्याचे अनेक कल्पक मार्ग शोधून काढले आहेत. तसेच  पर्यावरणाविषयी जागरूकता वाढते आहे. त्याला अधिक चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी ९ हजार ९९९ रुपयांचे प्रथम पारितोषिक, तर ६ हजार ६६६ रुपयांचे द्वितीय पारितोषिक दिले जाणार आहे. त्याचबरोबर २००१ रुपयांचे विशेष पारितोषिकही दिले जाईल. विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५ बाय ७ आकाराची तीन रंगीत छायाचित्रे ‘लोकसत्ता’च्या कार्यालयामध्ये ११ सप्टेंबपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावीत. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती व मखर यांची तीन बाजूंनी काढलेली छायाचित्रे पाठवावीत. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

छायाचित्रे पाठवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क

  • मुंबई

धर्मेश म्हसकर – ६७४४०३६९.

  • ठाणे

मिलिंद दाभोळकर – २५३९९६०७.

स्पर्धेकरिता छायाचित्रे  loksatta.ecoganesha@gmail.com  या ईमेल आयडीवर पाठवावीत. प्रत्येक छायाचित्रासोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, दूरध्वनी आणि मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी आणि सजावटीसाठी वापरलेल्या साहित्याची यादी पाठवावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 2:08 am

Web Title: eco friendly ganesha devotees loksatta akp 94
Next Stories
1 दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन
2 आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीच्या दर्शनाला राज ठाकरे
3 पाहा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती
Just Now!
X