X

‘लोकसत्ता’तर्फे यंदाही ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा’

दीड ते अकरा दिवसांचा घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना स्पर्धेत भाग घेता येईल.

मुंबई : पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीही ‘पर्यावरणस्नेही घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०१८’ आयोजित करण्यात आली आहे.

पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि साहित्य वापरून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. ही स्पर्धा मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर विभागांत घेण्यात येणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलसारख्या पर्यावरणघातक वस्तूंच्या वापराचे दुष्परिणाम आता सगळ्यांच्याच नजरेस येऊ लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची संकल्पना भाविकांमध्ये रुजत आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून घरगुती गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्याला अधिक चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ९९९९ रुपयांचे आणि द्वितीय पारितोषिक ६६६६ रुपयांचे आहे, तर विशेष पारितोषिक २००१ रुपयांचे आहे. रोख रकमेबरोबरच विजेत्यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

दीड ते अकरा दिवसांचा घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना स्पर्धेत भाग घेता येईल. ‘लोकसत्ता’च्या विभागीय कार्यालयांमध्ये बुधवार, २२ सप्टेंबपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करता येईल. आरास करण्यासाठी वापरलेले साहित्य, छायाचित्रे, संपर्क, पत्ता आदी माहिती या वेळी स्वीकारली जाईल. छायाचित्र व माहिती टपाल, कुरिअरद्वारे किंवा loksatta.ecoganesha@gmail.या ई-मेलवर पाठवता येईल. मुदतीनंतर आलेल्या छायाचित्रांचा विचार स्पर्धेसाठी केला जाणार नाही. गणेशमूर्ती आणि सजावट पर्यावरणस्नेही असावी. प्लास्टिक, थर्माकोलचा वापर नसावा. छायाचित्रात गणेशमूर्ती, मखर आणि सजावट स्पष्ट दिसावी त्यासाठी छायाचित्रे (वेगवेगळ्या कोनांतून काढलेली) काढून पाठवावीत. मूर्ती आणि सजावटीची तीन छायाचित्रे पाच बाय सात आकाराची व रंगीत असावीत. प्रत्येक छायाचित्रासोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, दूरध्वनी, मोबाइल, ई-मेल, वापरलेल्या साहित्याची यादी जोडावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

अधिक  माहिती साठी  संपर्क

’मुंबई – लोकसत्ता, सातवा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट. दूरध्वनी- ६७४४०३६९.

’ठाणे – लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा. दूरध्वनी- २५३९९६०७.

’नाशिक – वंदन चंद्रात्रे, लोकसत्ता ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड. भ्रमणध्वनी क्रमांक- ९४२२२४५०६५.

’ पुणे – अमोल गाडगीळ, दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि., एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट क्रमांक १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजीनगर. भ्रमणध्वनी- ९८८१२५६०८२.

’औरंगाबाद – मुकुंद कानिटकर, १०३ गोमटेश मार्केट, न्यू गुलमंडी रोड, औरंगाबाद- ४३१००१. दूरध्वनी क्रमांक ०२४०/२३४६३०३.

’अहमदनगर –

संतोष बडवे, पहिला मजला, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर- ४१४००१. भ्रमणध्वनी- ०९९२२४००९८१.

’नागपूर – गजानन बोबडे, वितरण विभाग, फ्लॅॅट नं. ३८, ऑडिसन ट्रेड सेंटर, पहिला मजला, डागा लेआऊट, अंबाझरी, नागपूर. भ्रमणध्वनी- ९८२२७२८६०३.

  • Tags: गणेशोत्सव २०१८,