मुंबई:  सुकर व जलद वाहतुकीसाठी पुन्हा आधुनिक प्रकारातील ट्राम चालवण्याचा पर्याय पुढे आला आहे. वांद्रे कु र्ला संकु लात वाढत जाणारी कार्यालये आणि अपुरी पडणारी सार्वजनिक वाहतुक पाहता या भागात ट्राम चालवण्यासाठी एमएमआरडीएने (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)पुढाकार घेतला आहे. यासाठी एमएमआरडीएकडून सल्लागार नियुक्त करण्यात आला असून त्याचा अभ्यास लवकरच सुरु करुन अहवाल सहा महिन्यात मिळणार आहे. ती मेट्रो मार्गिकांनाही जोडण्याचे नियोजन असणार आहे.

गेल्या काही वर्षात वांद्रे कुर्ला संकु लात मोठ्या प्रमाणात कार्यालयेही उभी राहिली. त्यामुळे दररोज वांद्रे कु र्ला संकु ल व परिसरात येणाऱ्यांची संख्या अधिक असते. कु र्ला स्थानक किं वा वांद्रे पूर्र्वे स्थानकात उतरुन अनेक  जण संकु लात कामानिमित्त येतात. त्यामुळे सुकर व जलद वाहतुकीचा पर्याय शोधला जात आहे.

या परिसरात स्वयंचलित जलदगती प्रणाली राबवण्याकरीता तांत्रिक व आर्थिक अभ्यास तयार करण्याकरीता नवी दिल्लीतील एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याचे एमएमआरडीकडून सांगण्यात आले. त्यांच्याकडून या भागात नवीन व पर्यायी वाहतुकीचा अभ्यास के ला जाईल. यात ट्राम किं वा अन्य वाहतुकीचा विचार के ला जाऊ शकतो.

वांद्रे कुर्ला संकुल आणि संकुलातील मेट्रो स्थानकांना ट्राम जोडतानाच संकु लातील रहिवाशी आणि इतर व्यावसायिक इमारतींना जोडण्यात येईल. ही प्रणाली पर्यावरणस्नोही,कार्बन विरहित उत्सर्जन असणारी असेल.  यामुळे होणारा आवाजही खूपच कमी असणार असल्याचे स्पष्ट के ले.

या मेट्रोंना  नवीन वाहतुक  सेवा जोडण्याचा प्रयत्न  ’मेट्रो मार्गिका-२ बी-डी.एन.नगर ते मंडाले (वांद्रे कु र्ला संकु ल, कु र्ला येथून जाणारी आहे)

’मेट्रो मार्गिका-३ कु लाबा ते सीप्झ (यात पहिला टप्पा सीप्झ ते वांद्रे कु र्ला संकु ल आहे,तर दुसरा टप्पा वांद्रे कु र्ला संकु ल ते कु लाबा आह

ट्रामचा इतिहास…

९ मे १८७४ रोजी घोड्याची ट्राम वाहतुक असणारे मुंबईतले पहिले ट्रॅम फाटे सुरु झाले. एक कु लाबा ते क्रॉफर्ड  मार्के ट मार्गे पायधुणीपर्यंत आणि दुसरा बोरीबंदरपासून काळबादेवी मार्गे पायधुणीपर्यंत. त्यानंतर कु लाबा ते क्रॉफर्ड  मार्के ट हा विजेचा पहिला ट्रॅमचा फाटा ७ मे १९०७ ला सुरु करण्यात आला. पुढच्या दोन ते तीन महिन्यातच नवीन ट्राम बोरीबंदर ते जे.जे.रुग्णालय व जे.जे ते राणीचा बाग धावली.  मार्च १९६४ ला बोरीबंदर ते दादर असा ट्रामचा अखेरचा प्रवास झाला.

जलद व सुकर प्रवासासाठी वांद्रे

कु र्ला संकु ल व परिसरात ट्रामबरोबरच लाईट रेल किं वा पॉड रेलचाही पर्याय शोधला जात आहे. वांद्रे तसेच कु र्ला रेल्वे स्थानकाला जोडतानाच भविष्यातील मेट्रो मार्गिका २ व मेट्रो मार्गिका ३ यांनाही जोडता येतो का ते पाहिले जाईल. -आर.ए.राजीव , आयुक्त, एमएमआरडीए