News Flash

लशींच्या तुटवड्यामागे आर्थिक गणित?

१ मेपर्यंत पुरेसा पुरवठा होण्याची शक्यता कमी

(संग्रहित छायाचित्र)

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणासाठी मागणी वाढत असताना देशभरात सगळीकडेच तीन-चार दिवसांपासून झालेल्या लशींच्या खडखडाटामागे आर्थिक गणित कारणीभूत असल्याची कु जबुज सुरू झाली आहे. १ मेपासून लशींचे दर वाढणार असल्याने पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याचा कयास सूत्रांनी व्यक्त केला.

करोनाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रसंवाद साधला तेव्हा यात सहभागी झालेल्या भाजप वा बिगरभाजप सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लशींचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी के ली. देशातील लस उत्पादक कं पन्यांची मर्यादित क्षमता लक्षात घेता अन्य देशांतील लशी आयात करण्यास आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली.

दरकारण…

लशींचा तुटवडा जाणवण्यामागे अर्थकारण असल्याचे बोलले जाते. १ मेपासून ‘कोव्हिशिल्ड’ लसीची मात्रा ही राज्यांना ४०० रुपये, केंद्राला १५० रुपये, तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांमध्ये पुरविण्याचे दरपत्रक सीरम इन्स्टिट्यूटने जाहीर के ले. ‘कोव्हॅक्सिन’  लशीच्या दराबाबत ‘भारत बायोटेक’ कं पनीने दर जाहीर के लेले नाहीत; परंतु दर वाढवून मिळावेत, अशीच या कं पनीची अपेक्षा आहे. हे नवीन दर १ मेपासून लागू होतील. तोपर्यंत पुरवठा सुरळीत होणार नाही, असे सूत्राकडून सांगण्यात आले. पेट्रोल किं वा अन्य कोणत्याही वस्तूंच्या दरात वाढ होणार असली की पुढील एक-दोन दिवस पुरेसा पुरवठा होत नाही. तसेच लशींबाबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाणे जिल्ह््यात अनेक केंद्रे बंद

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्र शुक्रवारी बंद ठेवावे लागले. ठाणे महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरही पुरेसा पुरवठा झाला नाही. भिवंडी वगळता ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागाला शुक्रवारी रात्री लशीचा साठा उपलब्ध झाला असला तरी तो दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच आहे. खासगी रुग्णालयातही लशीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लस घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात ५६ लसीकरण केंद्र्र आहे. या केंद्रावरील लशीचा साठा शुक्रवारी संपला. अंबरनाथ शहरात लशीचा साठा संपल्यामुळे शुक्रवारी केंद्रे बंद होती, तर कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात एक दिवस पुरेल इतकाच लशींचा साठा शिल्लक होता. तसेच लशीच्या तुटवड्यामुळे येथील अनेक केंद्रे शुक्रवारी बंद होती, तर उर्वरित केंद्रेही बंद होण्याची चिन्हे होती. शुक्रवारी रात्री जिल्ह््याला ५० हजार लशींचा साठा उपलब्ध झाला असून त्याचे जिल्हा प्रशासनाने शहरनिहाय वाटप केले. त्यामध्ये ठाणे शहराला १० हजार, कल्याण-डोंबिवलीला ७ हजार, नवी मुंबईला १२ हजार, मीरा भाईंदरला ७ हजार, उल्हासनगरला ४ हजार आणि ठाणे ग्रामीणला १० हजार लशीचे डोस उपलब्ध झाले आहेत. असे असले तरी ठाणे शहराला लशींचा साठा मिळाला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

मुंबईत दुसरी मात्रा घेणाऱ्यांनाच प्राधान्य

मुंबई : लस तुटवड्यामुळे मुंबईतील तब्बल ५२ केंद्रे दिवसभर बंद ठेवण्यात आली. तर उर्वरित सुरू असलेल्या केंद्रांपैकी १८ केंद्रांमध्ये लससाठा असेपर्यंतच केंदे्र सुरू राहील असे पालिका प्रशासनाने सकाळीच समाज माध्यमावरून जाहीर केले होते. लशीचा साठा खूपच कमी असल्यामुळे दुसरी मात्रा घ्यायला येणाऱ्यांना प्राधान्य द्यावे असे निर्देश पालिके ने केंद्रांना दिले आहेत.  दिवसभरात ४८ हजार २८० लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात २४ हजार लोकांनी दुसरी मात्रा घेतली तर २४ हजार लोकांनी पहिली मात्रा घेतली. पालिकेच्या केंद्रावर ३९ हजाराहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले. खासगी केंद्रांवर दिवसभरात के वळ २४२८ लोकांचे लसीकरण झाले.

पुण्यात वितरणाबाबत प्रश्न…

पुणे : पुण्यातील १७२ केंद्रांसाठी दिवसाला १७ हजार २०० लशींच्या मात्रांची आवश्यकता आहे. शुक्रवारच्या लसीकरणासाठी गुरुवारी महापालिके ला कोविशिल्डच्या १० हजार मात्रांचा साठा प्राप्त झाला. त्यामुळे शुक्रवारी त्याचे वितरण कसे करायचे, असा प्रश्न महापालिकेच्या आरोग्य विभागाला पडला.

नागपुरातही साठा अपुरा

नागपूर : सध्या महापालिकेत ‘कोव्हिशिल्ड’ ४ हजार २०० व ‘कोव्हॅक्सिन’ या ५०० लशी उपलब्ध असल्याचे महापालिकेच्या भांडार विभागाचे प्रमुख भातकुलकर यांनी सांगितले. नागपूर शहरात २२८, तर ग्रामीणमध्ये १५० केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. विदर्भात सर्वत्रच लशींचा पुरेसा पुरवठा झालेला नाही. परिणामी काही ठिकाणी लसीकरण बंद ठेवावे लागले किंवा सर्वांना लस मिळू शकली नाही.

टंचाई स्थिती…

मुंबईसह राज्यात सर्वत्रच लशींचा तुटवडा जाणवू लागला. शुक्र वारी दिवसभर राज्यात बहुतांश ठिकाणी लसीकरण थांबवावे लागले. काही ठिकाणी लसीकरण करण्यात आले असले तरी सर्वांना लस मिळू शकली नाही. ठाण्यातही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण थांबवावे लागले. लसीकरणासाठी लोकांना काही राज्यांमध्ये भल्या पहाटेपासून रांगा लावल्या, पण साठा नसल्याने तसेच परतावे लागले.

राज्याला पुरेशा लसींचा साठा मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. केंद्राला वारंवार या संदर्भात विनंती केली आहे. पुरेशी लस उपलब्ध होणार नसल्यास परदेशातील लस आयात करण्यास आम्हाला परवानगी द्यावी, अशीही मागणी के ली आहे. शेवटी अधिकाधिक जनतेचे लसीकरण व्हावे, हाच प्रयत्न आहे. केंद्राच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री

१ मेपासून लागू होणारे दर आणि सध्या होणारा पुरवठा याचा काहीही संबंध नाही.

– सीरम इन्स्टिट्यूटचे प्रवक्ते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:28 am

Web Title: economic math behind the shortage of vaccines abn 97
Next Stories
1 जिल्हा, राज्याबाहेरील प्रवासासाठी ई-पास बंधनकारक
2 शासकीय नोकरभरती खासगी कंपन्यांकडूनच
3 प्राणवायू, रेमडेसिविरचा राज्याला अधिक पुरवठा व्हावा
Just Now!
X