04 December 2020

News Flash

पीएमसी बँक प्रकरण : तीन संचालकांना अटक

मुंबई न्यायालयात उद्या हजर केले जाणार

(संग्रहित छायाचित्र)

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज बँकेच्या तीन संचालकांना अटक केली आहे. संचालक जगदीश मुखे, संचालक आणि कर्ज व आगाऊ रक्कम समिती सदस्या  मुक्ती बावीसी आणि संचालक आणि रिकव्हरी समिती सदस्या  तृप्ती बने अशी त्यांची नावं आहेत. त्यांना उद्या मुंबई न्यायालायात हजर केले जाणार आहे.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले होते. त्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. याप्रकरणी आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आलेली आहे.

पीएमसी बँकेच्या सुमारे ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण ठेव काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. याचबरोबर एकावेळी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती आज लोकसभेत अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली होती. हे  प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, रिझर्व्ह बँकेबरोबर सकारात्मक समन्वयाद्वारे याबाबत  सरकार पावलं  उचलत आहे. तसेच, अचानक आरोग्य विषयक उद्भवलेली गंभीर स्थिती, लग्न समारंभ, शिक्षणातील अडचणी आदी प्रसंगी पीएमसी बँकेच्या खातेधारकांना खात्यातून रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा देखील असल्याची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 9:27 pm

Web Title: economic offences wing arrested 3 directors of the board of pmc bank msr 87
Next Stories
1 “भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या”
2 डोंबिवली लोकलमधील गर्दीचा मुद्दा थेट लोकसभेत
3 धक्कादायक! माहिम समुद्रकिनाऱ्यावर सूटकेसमध्ये सापडले मानवी शरीराचे तुकडे
Just Now!
X