जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे अर्थकारण असते. राजकीय, सामाजिक पटलावर घडत असलेल्या कोणत्याही लहान किंवा प्रचंड मोठय़ा घटनेमागे असते ते अर्थकारण. मग माणसाच्या एवढय़ा निकट असलेले पर्यावरण यातून कसे सुटणार.. त्यातच अर्थकारणापायी पर्यावरणातील विविध घटकांवर होणारा परिणाम पाहता या दोघांमध्ये शत्रुत्वाचे नाते आहे असाच समज दृढ होतो. अर्थकारणाचा आणि पर्यावरणाचा नेमका संबंध काय, ही दोन टोके आहेत की नाण्याच्या दोन बाजू, शेती-उद्योग-शहरीकरणाच्या आड पर्यावरण येते का, विकसनशील देशांची प्रगती रोखण्यासाठी पर्यावरणीय असंतुलनाचा बागुलबुवा उभा केला जातो का, जागतिक तापमानवाढ, कार्बन उत्सर्जन या संकल्पना किती खऱ्या किती खोटय़ा.. अशा अनेक प्रश्नांचा गुंता पर्यावरणाचा साकल्याने विचार करणाऱ्यांच्या मनात निर्माण होतो. हा गुंता सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या विषयातील तज्ज्ञ ‘लोकसत्ता’च्या बदलता महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत होत असलेल्या ‘आपण आणि पर्यावरण’ या परिषदेत करणार आहेत. लोकसत्ताने टीजेएसबी सहकारी बँक लि.च्या सहकार्याने ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या या परिषदेला रिजन्सी ग्रुप आणि केसरीचीही मदत मिळाली आहे.

पाण्याच्या रोमांचक कथा आणि त्यातला मानवी हस्तक्षेप, जंगलाच्या गुजगोष्टी यांच्यासह शहरातील पर्यावरण आणि टाकाऊ पदार्थानी व्यापलेली पृथ्वी यासंबंधीही या परिषदेत चर्चा होणार आहे.

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
environment issue in election manifestos environmental issues in lok sabha election 2024
या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..

उपायांचा शोघ..

पर्यावरणातील असंतुलनाचे परिणाम सर्वच सजीव घटकांवर होतात. मुळात हे सजीव घटक या पर्यावरणाचा भाग असतात. त्यातच पशु-पक्षी, माणसे, झाडे या घटकांवर होत असलेल्या परिणामांचा प्रभाव त्यांच्या परस्परसंबंधांवरही होतो आणि मग संतुलन आणखी ढासळते. बिबळ्यांना वाचवायचे की आदिवासींच्या समस्या हाताळायच्या, हत्ती हवेत की शेती असे प्रश्न त्यातूनच उभे राहतात. मानव-प्राणी संघर्षांपुरतीच ही कथा राहत नाही. मानवाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आरोग्यावरही पर्यावरणाचा अत्यंत गंभीर परिणाम होतो. तो नेमका कसा होतो हे लक्षात घेतले की पर्यावरण संतुलन कसे राखावे यावरील उपाय उमजणे कठीण होणार नाही. पर्यावरणीय असंतुलन आणि आपण या चर्चासत्रात पशुवैद्यक अधिकारी, आरोग्यतज्ज्ञ आणि समाज कार्यकर्ते असे तीन विविध क्षेत्रातील अभ्यासक एकाच व्यासपीठावर येत आहेत.