24 November 2020

News Flash

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ‘हंसा रिसर्च ग्रुप’च्या कर्मचाऱ्यांसह काही वाहिन्यांच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे

(संग्रहित छायाचित्र)

बनावट टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्य़ावरून ईडीने हा गुन्हा नोंदविला आहे.

वाहिन्यांच्या जाहिरातींसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘टीआरपी’मधील घोटाळा उघडकीस आल्यानंतर रेटिंग एजन्सी ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने’ (बीएआरसी) तक्रार नोंदविली होती. वाहिन्यांना जाहिरातींमधून मिळणारा महसूल वाढावा यासाठी लाच दिल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. या प्रकरणी ‘रिपब्लिक’ वाहिनीसह, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ यांची नावे समोर आली आहेत. यात मुंबई पोलिसांच्या तक्रारीत नमूद माध्यम समूहांचे अधिकारी आणि इतर आरोपींना चौकशीसाठी ईडीकडून लवकरच समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ‘हंसा रिसर्च ग्रुप’च्या कर्मचाऱ्यांसह काही वाहिन्यांच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी वाहिन्यांच्या उच्चाधिकाऱ्यांना समन्स बजावून त्यांची चौकशी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:13 am

Web Title: ed files case against trp scam abn 97
Next Stories
1 पुस्तकपाळांची अर्थकोंडी
2 सीईटीमधील चुकीच्या प्रश्नांचे विद्यार्थ्यांना गुण
3 वीजबिल माफीचा विचार अजूनही कायम
Just Now!
X