‘ईडी’चे समन्स, देशमुख यांची कागदपत्रांची मागणी

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे, स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना नऊ तासांच्या सलग चौकशीअंती शुक्रवारी रात्री अटक केली.  तर देशमुख यांना समन्स जारी करत चौकशीस बोलावले. मात्र ईडीने तपासावर घेतलेले प्रकरण नेमके  कोणते, हे प्रथम सांगावे त्यानंतर चौकशीस हजर राहू, अशी भूमिका देशमुख यांनी घेतली. देशमुख यांच्या वकिलाने शनिवारी ईडी अधिकाऱ्यांची भेट घेत तपास सुरू के लेल्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची मागणी के ली.

मुंबईतील दहा बारमालकांनी गेल्या तीन महिन्यांत देशमुख यांना चार कोटी रुपयांची लाच दिल्याचे जबाबात सांगितले, असा दावा ईडीतील सूत्रांनी के ला. या माहितीची शहानिशा करण्यासाठी किं वा या माहितीस दुजोरा देणारे पुरावे शोधण्यासाठी शुक्र वारी  देशमुख, पालांडे, शिंदे यांच्याशी संबंधित नागपूर, मुंबईतील मालमत्तांवर छापे घाालून शोधाशोध केली. नऊ तासांच्या चौकशीत समाधानकारक उत्तरे न देता असहकार्य के ल्याने संशयाच्या बळावर दोघांना अटक के ल्याचे ईडी अधिकाऱ्याने सांगितले.

या कारवाईनंतर देशमुख यांच्याकडे चौकशी करणे क्र मप्रात ठरले. त्यासाठी त्यांना समन्स जारी करून शनिवारी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट के ले. मात्र देशमुख यांच्याऐवजी त्यांच्या वकिलाने  प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मागणारे पत्र  सादर के ले.

नागपूरच्या शिक्षण संस्थेत पैसे वळवल्याचा दावा

मुंबईतील बार, पब आदी आस्थापनांकडून उकळलेल्या ४.७० कोटी रुपयांपैकी ३.१८ कोटी रुपये  देशमुख यांनी त्यांचे चिरंजीव ऋषीके श यांच्या माध्यमातून नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट या संस्थेत फिरवले. संस्थेत देणगीस्वरुपात ही रक्कम जमा झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी प्रथम ही रक्कम दिल्लीतील दोन व्यक्तींना हवालाद्वारे पोच के ली गेली. नंतर या दोन व्यक्तींच्या नावे नोंद बोगस कं पन्यांच्या खात्यातून ही रक्कम संस्थेत वळविण्यात आल्याचा दावा शनिवारी सक्तवसुली संचलनालयाने विशेष न्यायालयात के ला. या  व्यवहारांमध्ये देशमुख यांचा स्वीय सहायक कुंदन शिंदे प्रत्यक्ष सहभागी असल्याचेही एनआयएने न्यायालयाला सांगितले.

दोन महिन्यांत ४.७० कोटींची लाच?

सचिन वाझे यांनी दिलेल्या जबाबात देशमुख यांनी काही प्रकरणांच्या तपासाबाबत थेट सूचना दिल्याचे सांगितले. तसेच एका बैठकीत देशमुख यांनी शहरातील बार, पब आदी आस्थापनांकडून महिन्याकाठी तीन लाख रुपये गोळा करण्यासही सांगितले. त्यासाठी शहरातील बार मालकांची बैठक घेतली. यावर्षी जानेवारी आणि फे ब्रुवारी महिन्यात दक्षिण, मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांतील ऑर्केस्ट्रा बारकडून एक कोटी ६४ तर पश्चिाम उपनगरांतील आस्थापनांकडून दोन कोटी ६६ लाख रुपये गोळा के ले. त्याशिवाय गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात जया पुजारी आणि महेश शेट्टी या बार मालकांनी इतरांच्यावतीने ४० लाख रुपये ‘गुड लक’ म्हणून दिले होते. ही सर्व रक्कम देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्या हवाली के ली होती.