News Flash

अविनाश भोसले यांना १ कोटी ८३ लाखांचा दंड

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक-उद्योजक अविनाश भोसले यांना अंमलबजावणी संचालनालयाने १ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

| January 15, 2015 03:31 am

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक-उद्योजक अविनाश भोसले यांना अंमलबजावणी संचालनालयाने १ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘फेमा’ कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
भोसले यांना २००७ मध्ये अवैधरित्या परकीय चलन भारतात आणल्या प्रकरणी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यावेळी भोसले यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात रोकड व महागडय़ा परदेशी वस्तू सापडल्या होत्या.
भोसले हे कॉंग्रेसचे नेते पतंगराव कदम यांचे व्याही आहेत. पतंगराव यांचे पुत्र विश्वजित आणि भोसले यांची कन्या स्वप्नाली यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 3:31 am

Web Title: ed impose penalty of 1 83 crores on avinash bhosale
Next Stories
1 स्वस्त तिकीट दरांमुळे प्रवासी ‘हवेत’
2 गटनेत्यांनंतर आता समिती सदस्यांचे अभ्यास दौरे
3 बनावट डिमांड ड्राफ्ट देऊन गंडवणारी टोळी अटकेत
Just Now!
X