29 September 2020

News Flash

राज कुंद्रा अडचणीत, इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणी ईडीकडून समन्स

राज कुंद्रा यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत भर पडली आहे. इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावलं आहे. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडासोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. त्यामुळेच राज कुंद्रा यांची ४ नोव्हेंबर रोजी चौकशी केली जाणार आहे. मात्र राज कुंद्रा यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.

इक्बाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघ बिंद्रासोबत राज कुंद्रांनी हा व्यावसायिक करार केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. रंजित बिंद्रा इक्बाल मिर्चीसाठी काम करतो असा आरोप आहे त्याचमुळे राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे मात्र राज कुंद्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशीलांची पडताळणी करत असताना ईडीला राज कुंद्रा यांच्यासंदर्भातली माहिती आढळली. कारण या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आलं. ही कंपनी राज कुंद्रा यांच्या मालकीची आहे तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे. दरम्यान २०११ मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागद माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 7:54 am

Web Title: ed summons businessman actor shilpa shettys husband raj kundra in connection with matter related to underworld don iqbal mirchi scj 81
Next Stories
1 अशोक सराफ यांच्या ‘प्रियतम्मा’वर आली पेन्शनवर जगण्याची वेळ
2 बिग बॉसमधील ‘या’ स्पर्धकाने केला होता सनी लिओनीचा विनयभंग
3 WWE सुपरस्टार जॉन सिनाच्या दिवाळी शुभेच्छा, शेअर केला रणवीरचा फोटो
Just Now!
X