मुंबई : टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या कथीत आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स जारी करून चौकशीस बोलावल्याची माहिती आहे. गेल्या आठवडय़ात सरनाईक यांचे निवासस्थान, कार्यालयात ईडीने छापे घालून शोधाशोध के ली होती. तसेच त्यांचे पुत्र विहंग यांना विभागीय कार्यालयात आणून चौकशीही के ली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरनाईक सध्या विलगीकरणात आहेत.

ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरनाईक यांना समन्स जारी करून गुरुवारी चौकशीस बोलावले आहे. छाप्यांनंतर ईडीने सरनाईक आणि टॉप्स ग्रुपचे प्रमुख राहुल नंदा यांच्याशी संबंधीत अमित चांदोले या व्यक्तीला अटक के ली.

टॉप्स ग्रुप कंपनीने एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरविण्याच्या करारात घोटाळा के ला. या घोटाळ्यातील निम्मा वाटा किं वा नफा सरनाईक यांना मिळाला, अशी माहिती चांदोले याने चौकशीदरम्यान दिल्याचा दावा ईडीने के ला.