News Flash

भारनियमन मुक्ती व वीज परिस्थितीत सुधारणा झाल्याचा परिणाम

महाराष्ट्रातील वीज परिस्थितीत झालेली सुधारणा व उद्योगांना भारनियमनातून मुक्ती मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर भारनियमनामुळे बेजार झालेल्या तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील उद्योगांनी महाराष्ट्रात स्थलांतर करण्याचा विचार सुरू असल्याचे जाहीर

| March 14, 2013 05:41 am

महाराष्ट्रातील वीज परिस्थितीत झालेली सुधारणा व उद्योगांना भारनियमनातून मुक्ती मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर भारनियमनामुळे बेजार झालेल्या तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील उद्योगांनी महाराष्ट्रात स्थलांतर करण्याचा विचार सुरू असल्याचे जाहीर केले आहे.
तामिळनाडूत उद्योगांना रोज १० ते १४ तासांचे भारनियमन आहे. त्यामुळे तेथील उद्योजक बेजार झाले आहेत. कारखाना सुरू ठेवायचा तर त्यांना जनरेटरवर वीजनिर्मिती करावी लागते व तो दर सुमारे १२ रुपये प्रतियुनिट इतका पडतो. त्यामुळे कारखाना चालवणे तेथील उद्योजकांसाठी कठीण झाले आहे.
कोईम्बतूर हे तामिळनाडूतील मोठे औद्योगिक केंद्र आहे. तामिळनाडूत वीज परिस्थिती बिकट असताना महराष्ट्रात मात्र विजेच्या परिस्थितीत चांगलीच सुधारणा झाली आहे. ८० टक्के राज्य भारनियमनमुक्त झाले असून उद्योगांना तर गेल्या वर्षभरापासून २४ तास वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे व्यवसाय वाचवण्यासाठी तामिळनाडूत राहण्याऐवजी महाराष्ट्रात जाऊन उद्योग काढणे परवडणारे असल्याचे तेथील उद्योजक के. रामस्वामी यांनी जाहीर केले. तसेच महाराष्ट्रात वा गुजरातला स्थलांतराबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात आता उद्योगांना रात्रीच्या वीजवापरासाठी अडीच रुपये प्रतियुनिट इतकी सवलत दिली जात आहे. शिवाय औद्योगिक भारनियमनच रद्द झालेले असल्याने अखंड वीजपुरवठय़ासाठी असलेला ५० पैसे प्रतियुनिटचा जादा दरही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे वीज परिस्थिती बिकट असलेल्या राज्यांना आता गुजरातबरोबरच महाराष्ट्राचाही आधार वाटू लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 5:41 am

Web Title: effect of loadshedding free and development in electric system
Next Stories
1 महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित टेहळणी यंत्रणा
2 कल्याण-कर्जत जलद गाडी सुरू होणार
3 कोइम्बतूरच्या उद्योगांचे महाराष्ट्राकडे डोळे
Just Now!
X