28 October 2020

News Flash

मुंबईत एक डझन अंडयांचा दर ८० रुपये

किरकोळ बाजारपेठेत अंडयांची मागणी वाढली असून वांद्रयामध्ये एक डझन अंडयांचे दर ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मान्सूनच्या काळात कोंबडयांचे अंडी देण्याचे प्रमाण कमी असते.

(संग्रहित छायाचित्र)

किरकोळ बाजारपेठेत अंडयांची मागणी वाढली असून वांद्रयामध्ये एक डझन अंडयांचे दर ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गोरेगावमध्ये ७२ आणि वाशी बाजारपेठेत एक डझन अंडयांचा दर ६५ ते ७० रुपये आहे. मान्सूनच्या काळात कोंबडयांचे अंडी देण्याचे प्रमाण कमी असते. त्याशिवाय निर्यातही उत्तम सुरु आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात अंडयांचे दर आणखी वाढू शकतात असे चेन्नईतील एका अंडयांच्या घाऊक विक्रेत्याने सांगितले.

चेन्नई हे देशातील कुक्कुटपालनाचे मुख्य केंद्र आहे. सध्या एका अंडयाचा दर ४ रुपये ५० पैसे आहे. वाहतूक खर्च पकडून ती किंमत ४ रुपये ९० पैसे होते. मान्सूनच्या आधी एका अंडयाची किंमत ४ रुपये २५ पैसे होती. पुढच्या काही महिन्यात एका अंडयाचा दर ५ रुपये १० पैसे होईल अशी माहिती चेन्नईच्या श्रीसुक्तम सोल्युशन्सचे श्रीधर यांनी दिली.

ओमान, कतार, दुबई आणि काही आफ्रिकन देशांमधून अंडयांना चांगली मागणी आहे. चेन्नईमधून ८० देशांमध्ये अंडयांची निर्यात केली जाते असे श्रीधर यांनी सांगितले. श्रावण सुरु होईपर्यंत अंडयांचे दर चढेच राहतील असे श्रीधर यांनी सांगितले. श्रावणात महिनाभर लोक शाकाहाराला प्राधान्य देतात. त्यावेळी अंडयांचे दर खाली येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 6:19 pm

Web Title: egg prices high in mumbai
Next Stories
1 BLOG : राज्य सरकार आणि ‘सरकार राज’!
2 राज ठाकरेंनी अचूक ओळखले उद्धव ठाकरेंच्या मनातले
3 राज्यातील मेगा नोकर भरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण: मुख्यमंत्री
Just Now!
X