मानखुर्द येथील बालसुधारगृहातील आणखी आठ मुले करोनाबाधित असल्याचे आढळून आली आहेत. एका निवासी डॉक्टरालाही करोनाची बाधा झाली  आहे. आठ दिवसांपूर्वी २९ गतिमंद मुले करोनाबाधित आढळून आली होती. उपचारानंतर यातील २५ मुले करोनामुक्त झाली आहेत.

मानखुर्द बालसुधारगृहात काही दिवसांपूर्वी एका सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाली होती. या कर्मचाऱ्याचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर पालिकेने तात्काळ येथे एक शिबीर आयोजित करून २६८ मुलांची प्राथमिक तपासणी केली होती. यातील ८४ मुलांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली. सुधारगृहात या मुलांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरासह अन्य आठ मुलांना देखील करोनाची लागण झाली आहे.