News Flash

विविध दुर्घटनांमध्ये आठजण जखमी

इमारतीमधील एका घरात दुरुस्तीचे काम सुरू होते.

विविध दुर्घटनांमध्ये आठजण जखमी

मुंबई : चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस कोसळत असताना चेंबूर, शीव आणि अंधेरी परिसरात घडलेल्या निरनिराळ्या घटनांमध्ये आठजण जखमी झाले. यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर उर्वरित पाच जखमींना उपचार करुन घरी पाठविण्यात आले.

चेंबूर (पूर्व) येथील सुमननगरमधील चिखलवाडीतील प्रियदर्शनी इमारतीमधील एका घरात दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याच वेळी भिंतीचा काही भाग कोसळून घरातील चौघेजण जखमी झाले. यापैकी तिघांना माँ रुग्णालया, तर एकाला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. आश्रय माळी (२१), सुदर्शन माळी (२३), आकाश माळी (२६), सागर हनुमान (२२) अशी जखमींची नावे आहेत. आश्रयला माँ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुदर्शन व आकाशवर उपचार करुन घरी पाठविण्यात आले. सागरला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

बोरिवली (पूर्व) येथील काजूपाडा परिसरातील अभिनव नगरमधील एका घरावर क्रेनचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत कुंदा सकपाळ (४०), सागर सकपाळ (२५), देवयानी सकपाळ हे तिघे जखमी झाले. स्थानिक रुग्णालयात उपचार करुन या तिघांनाही घरी पाठविण्यात आले.

अंधेरी (पश्चिाम) येथील गणेश नगर सोसायटीतील एक मजली इमारतीतील खोली क्रमांक १८ चा काही भाग कोसळून एक महिला जखमी झाली. या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:22 am

Web Title: eight injured in various different accidents akp 94
Next Stories
1 सीबीआय चौकशीचे आदेश द्यायला भाग पाडू नका
2 हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतरही पूर्वतयारीत पालिका अपयशी
3 दोन आरोपींविरोधातील ‘एमएमसी’च्या चौकशीला स्थगिती
Just Now!
X